एकदम बेसिक माहिती : बॅंकेत तुम्ही पैसे ठेवता एफडी, किंवा साधं सेव्हिंग अकाऊंट काढता त्याला बँक Liability म्हणते आणि बँक तुम्हाला पैसे (कर्ज) देते त्याला Asset म्हणतात. समजलं? आयला! मग थोडं कन्फ्युज करतो.. तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेली गाडी किंवा घर हे तुमचे Asset आहेत आणि तुम्ही घेतलेलं कर्ज ही तुमची Liability असते! बेसिक मध्येच लोचा असेल तर परत सुरवातीपासून सुरवात करा. बरं हे मी यासाठी सांगतोय कारण परवा तुम्ही फक्त चप्पलचाटू होतात, काल तुम्ही पायपुसणं झालात. असो.. गुलामी केली, प्रगती झाली! बरं ते वडापाव, टी-शर्ट आणि टोपी साठी 'काय पन' करणाऱ्यांनी तर कृपया डोकंच लावूच नये. तुमचं प्रबोधन फक्त सामनाच करू शकतो. आणि हो, उन्हाळा वाढतोय तेंव्हा जे उरले त्यांनी आधारवडाखाली निवांत पडी मारावी.. आता, 'राईट ऑफ' म्हणजे काय? कर्ज किंवा मालमत्ता 'राईट ऑफ' करणे याचा अर्थ असा आहे की त्या कर्जाच्या वसुलीचे 'बँकेकडे उपलब्ध असलेले' सर्व मार्ग संपल्यानंतर आणि थकीत कर्जाची वसुली होण्याची शक्यता दूरस्थ वाटल्यानंतर एक नॉन-परफॉर्मिंग ऍसेट (एनपीए) बनते. मग, ताळेबंद(बॅलन्स शी...