बँक नफा कसा कमवतात हे थोडक्यात पाहुयात: भांडवलाचा स्रोत

बँक लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेते. बँकेत लोकांच्या ठेवी म्हणजे त्यांनी बँकेला दिलेले कर्ज आणि त्याबदल्यात बँक त्यांना दरवर्षी ठराविक रक्कम Interest (व्याज) म्हणून देते आणि ठेवीची मुदत संपल्यानांतर मुद्दल परत करते. म्हणजे लोकांच्या ठेवी ही झाली बँकेची Liability (दायित्व) आणि ठेवींवरील व्याज हा झाला Expense (खर्च). ठेवीच्या स्वरूपात मिळालेले पैसे पुढे बँक ठराविक मुदतींसाठी कर्ज म्हणून देते आणि त्या कर्जावर व्याज लावते. बँकेनी दिलेल्या कर्जाची मुद्दल बँकेला मुदत अखेरीस वापस मिळते. म्हणजेच दिलेल्या कर्जाची येणारी मुद्दल हे झाले बँकेचे Assets (मालमत्ता) आणि दिलेल्या कर्जावरील मिळणारे व्याज झाले Income (उत्पन्न).
एखादी बँक तिच्या कडे जमा असलेल्या सर्व ठेवींवर जर सरासरी .% व्याज देत असेल तर ती ज्या सगळ्या लोकांना कर्ज देत आहे त्यातुन मिळणारे सरासरी व्याज हे नक्कीच .% पेक्ष्या जास्त असायला हवे. सरासरी व्याज खर्च आणि सरासरी व्याज उत्पन्न ह्यामध्ये एवढा फरक हवा की बँकेचे बाकी सर्व इतर खर्च जसेकी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार, Building, Information Technology, ATM ह्यावरील खर्च निघून बँकेला Profit (नफा) व्हायला हवा.
ठेवीवरील द्यायचे व्याज म्हणून जो खर्च होतो त्याला म्हणतात Interest Expense आणि दिलेल्या कर्जातून मिळण्याच्या व्याजातून जे उत्पन्न होते त्याला म्हणतात Interest Income. ह्या दोन्ही मधील फरकाला म्हणायचे Interest Margin. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची वर्ष २०१७ मध्ये Interest Margin होती .%. म्हणजे जर ठेवीदारांच्या सर्व ठेवींवर SBI ने सरासरी .% व्याज दिले असेल तर तिला सरासरी १०.% व्याज उत्पन्न म्हणून मिळाले असेल.

Comments